नागपूर: आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसअसताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारलेली असल्याचे दिसून आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच खातेवाटप होणार असल्याचे याआधीच सांगितले होते पण दोन दिवस उलटूनही अद्याप पर्यंत खाते वाटपाचे घोडे अडकल्याचे दिसून येते तर प्रभावी खाते शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार यांना मिळत नसल्याने अंतर्गत नाराजी असून याबाबत चांगली खाती मिळवण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला गेली असल्याची चर्चा सुद्धा रंगू लागली आहे सोबतच अनेक नाराज आमदारांना मंत्रिपद न दिल्याने समजवण्याची व ज्यांना मंत्री पदाची शपथ दिली त्यांना चांगली खाती देण्याची तारेवरची कसरत या दोन्ही नेत्यांवर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसासह ही दोन्ही उपमुख्यमंत्री कसा मार्ग काढतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे
