नागपूर : मंत्री पदाची हुलकावणी मिळालेले चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याची चर्चा असतानाचआज त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावल्या जात असताना बाहेर येत त्यांनी माध्यमांना मात्र मी कुठलाही नाराज नसल्याचे स्वतः सांगून त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला तर पुढे पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सुधीर मुनगंटीवार यांना विशिष्ट जबाबदारी देणार असल्याचे सांगितले असल्याने आता त्यांना कोणती जबाबदारी दिली जाते याकडेआता सर्वांचे लक्ष लागलेले आहे
