नागपूर: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दोन दिवसात खाते वाटप केले जाणार असल्याची घोषणा केली होती अर्धे हिवाळी अधिवेशन उलटून गेले मात्र खाते वाटपाचा तिढा सुटला नाही यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी विधानसभेत उपस्थित मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय खाते वाटप करणार नाही असे सांगून हा मुद्दा टोलवला त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला छगन भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून नाशिक मध्ये निघून गेले आहेत त्यांनी तिकडे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी मेळावा घेत अजित पवारांच्या विरोधात मोहीमच उघडली आहे तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार मी नाराज नाही असे सांगत रोजच आपली नाराजी व्यक्त करीत आहेत त्यामुळेच खातेवाटपही रखडले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे अधिवेशनात मंत्री आहेत पण त्यांच्याकडे खातेच नाही अशी परिस्थिती आहे
