नागपूर:मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना शायरीतून व्यक्त केल्या. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मी संपलो आता पुन्हा येणार नाही असे ज्यांना ज्यांना वाटले त्यांना आपल्या हटके अंदाज शायरीतून प्रत्युत्तर दिले .” आंधियोमे जलता दिया मिल जायेगा , उस दिये से पूछो मेरा पता मिल जायेगा..” छगन भुजबळ यांनी जहा नही चैना,वहा नहीं. रैना … अशी शायरी पेस करून बंडाचे निशाण फडकवले आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी वक्त आयेगा वक्त जायेगा असे बोलूनआशा कायम असल्याचे संकेत दिले आहे. आता अशातच फडणवीस यांच्या या शायरीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे