नागपूर: प्रसिद्ध सिने अभिनेता आणि फिल्म सेंसार बोर्डाचे माजी सदस्य संजय कुमार मुंबई यांची नियुक्ती शायना टाइम्स चे कार्यकारी संपादक (फिल्मस) या पदावर मुख्य संपादक रत्नदीप दहिवले यांनी केली आहे त्यांनी आपला पदभार मुंबई येथील लोखंडवाला येथील कार्यालयात सांभाळलेला आहे संजय कुमार हे मूळचे नागपुरातील असून त्यांनी अनेक मराठी सिनेमामधून भूमिका साकारलेले आहेत फिल्म सेंसार बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी या आधी काम केलेले आहे त्यांच्या कार्याचा अनुभव लक्षात घेता शायना टाइम्सच्या फिल्म विभागाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शायना टाइम्स से कार्यकारी संपादक (पॉलिटिकल) मनोज रायपुरे यांनी त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
