नागपूर: (मनोज रायपुरे )विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला महाराष्ट्रात शंभर उमेदवार उभे असताना फक्त 16 आमदार निवडून आले याचे खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडले जात आहे त्यांचे विषयी असलेली नाराजी पाहता नव्या प्रदेशाध्यक्षाचे नावाची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूर मध्ये दाखल झाल्याची माहिती आहे काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला हे काल रात्री आठ वाजताच्या सुमारास नागपुरातील ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयामध्ये उपस्थित झाले आजी-माजी आमदार आणि खासदारांची बैठक घेतली त्यामुळे नाना पटोले यांची गच्छंती अटळ मांनल्या जात आहे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि 44 आमदार असताना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर सोपवली होती त्यांच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आता फक्त 16 आमदार शिल्लक राहिले आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी यापेक्षा मोठा पुरावा आणि दुसऱ्या कारणाची गरज नाही असे वक्तव्य काँग्रेसचे नेत्यांनी केले आहे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते त्याचे श्रेय नाना पटोले यांनी आपल्याकडे घेतले आता पराभवाची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल असे यापूर्वीच माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहे
