April 19, 2026 3:43 pm

Search
Close this search box.

संजय बोरीकर यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुंबई समितीवर निवड

मुंबई:
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) मुंबई विभागाच्या सल्लागार समितीवर ज्येष्ठ सिने कलाकार आणि ‘शायना टाईम्स’चे कार्यकारी संपादक (चित्रपट विभाग) संजय बोरीकर  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय बोरीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट आणि पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. ‘शायना टाईम्स’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट विश्वातील घडामोडींवर प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या याच अनुभवाची दखल घेत मंत्रालयाने ही महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
चित्रपट प्रमाणन मंडळात (सेन्सॉर बोर्ड) होणारी ही नियुक्ती चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक आणि सामाजिक भान जपण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. संजय बोरीकर यांच्या निवडीबद्दल चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी तसेच सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील विविध समस्या मांडण्यास आणि चांगल्या चित्रकृतींना प्रोत्साहन देण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या नियुक्तीसाठी शायना टाईम्स चे मुख्य संपादक रत्नदीप दहिवले,उपसंपादक मनोज रायपुरे ,अभिनेते कन्हैया कुमार सिंह, तेज़स अनंत,गौतम रामावत,आदर्श चौरसिया  यांनी अभिनंदन केले आहे
.

Leave a Comment

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें