April 19, 2026 5:01 pm

Search
Close this search box.

अखेर पटेलांनी मांडला प्रस्ताव राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणे पुढे येऊन उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यापाठोपाठ त्यांनी पक्षाची जबाबदारीही स्वत:कडे घेतली आहे. सुनेत्रा पवार यांची एकमताने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष पवारच हवा, असा ‘महाशक्ती’चा निरोप असल्याने पटेल यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहें याआधी सुद्धा एका केंद्रीय मंत्र्यांनी प्रफुल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचे एका दूरचित्रवाणीच्या मुलाखतीत बोलताच प्रफुल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच्या बातम्या लगेच  चॅनेलवाल्यांनी दाखवायला सुरवात केली होती त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना लोकांच्या टीकेला उत्तर द्यावे लागले होते.व् मी अध्यक्षपदाचे शर्यतीत नाही असे जाहीर केले होते आज  मुंबई वरळी डोम येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले यावेळी देशभरातून पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आवाजी मतदानाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची एकमताने निवड केली गेली पत्रपरिषदेतून अखेर पक्षाच्या संविधानानुसार सुनेत्रा पवार यांची गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे पटेल यांनी घोषित केले

Leave a Comment

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें